ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल पिलानीवाडी शाळेला दोन संगणक भेट

पुणे : न्यू इंग्लिश स्कूल पिलानीवाडी शाळेला आज नरेवाडी गावचे सुपुत्र मेघा लाईट प्रा.लि. मुबई या कंपनीचे प्रमुख साहेबराव चव्हाण यांनी दोन नवीन संगणक भेट दिले. विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षण घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या स्पर्धेच्या युगात कोठेही मागे राहू नये यासाठी सर्वोतोपरी सहयोगी करण्याचे आश्वासन दिले.

याच कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती हरी ओम स्पोर्ट चे प्रमुख साहेबराव कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट युनिफॉर्म देण्याची ग्वाही दिली तसेच दिलीप यादव यांनी सायकल बँक या शाळेच्या योजनेसाठी सहकार्य करणार असल्याचे नमूद केले.

याच भागातील श्रीकांत कदम यांनी चालू शैक्षणिक वर्षात नववी आणि दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण पुस्तक संच भेट दिले होते मात्र इथून पुढे प्रत्येक वर्षी त्यांच्याकडून नववी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक संच देण्याची घोषणा त्यांनी केली.

चांगल्या विचारांची मांणसे एकत्र आली की खरोखर विधायक काम होत याची प्रचिती आजच्या कार्यक्रम प्रसंगी आली. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक, स्थानिक ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी विनोद कदम यांनी केले तर आभार देशमुख यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button