ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

शिवसेना नेत्याच्या टीकेने महाविकास आघाडीत खळबळ

औरंगाबाद |  शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी केल्या जात असल्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या आरोपाला शिवसेनेकडून उत्तर देण्यात आला आहे. मुळात माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष नावालाच राहिला आहे, त्यामुळे त्यांना फोडण्याचा विषयच येत नाही. तर राष्ट्रवादी पक्ष ‘प्रायव्हेट कॅरियर पार्टी’ झाली आहे, असा खोचक टोलाही सत्तार यांनी यावेळी लगावला. औरंगाबाद येथे सिंचन विभागाच्या बैठकीला आले असताना ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की, टोपे यांचे विधान म्हणजे त्यांच्या मतदारसंघात जे घडत आहे, त्याबद्दल त्यांना आठवण झाली असावी. आमच्याकडे राष्ट्रवादी पक्ष फक्त नावालाच राहिला आहे, त्यामुळे कुणी फोडण्यासारखं राहीलच नाही. राजकारणात त्यांच्याकडे एकही ‘पब्लिक कॅरियर’ नसून राष्ट्रवादी पक्ष आता प्रायव्हेट कॅरियर पार्टी’ झाली असल्याची खोचक टीका सत्तार यांनी यावेळी केली. त्यामुळे शिवसेना- राष्ट्रवादीमधील राजकीय वातावरण आणखीनच तापणार असल्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते राजेश टोपे…..
सोमवारी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि राजेश टोपे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादीच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांकडून वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप केला. तर शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांना फोडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं टोपे म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button