व्हिडिओ चौकटीच्या वर दिसणाऱ्या फोटो आणि टेक्स्ट स्वरुपातील जाहिराती गुगल हटवणार…
गुगल क्रोम ब्राऊजर आणि युट्यूबवरून ग्राहकांना अनावश्यक त्रास देणाऱ्या व्हि़डिओ जाहिराती हटविण्यात येणार आहेत. गुगलचे प्रॉडक्ट मॅनेजर जेसन जेम्स यांनी ही माहिती दिली. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जाहिरातींच्या दर्जासंदर्भात नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. याच नियमावलीनुसार तीन प्रकारच्या व्हिडिओ जाहिराती येत्या काळात वेबसाईटवर दाखविण्यात येणार नाहीयेत…
जास्त लांबीच्या आणि ग्राहकाला हटविता किंवा बंद न करता येणाऱ्या व्हिडिओ स्वरुपातील जाहिराती पुढील काळात बंद होतील. युट्यूबवरील व्हिडिओ सुरू होण्याआधी या जाहिराती दिसतात. व्हिडिओच्या मध्यामध्ये दिसणाऱ्या दीर्घ मुदतीच्या जाहिराती पुढील काळात दिसणार नाहीत. अनेक ग्राहकांना या स्वरुपाच्या जाहिरातींमुळे त्रास होतो. व्हिडिओ पाहण्याच्या त्यांच्या आनंदावर विरजण पडते.
व्हिडिओ चौकटीच्या वर दिसणाऱ्या फोटो आणि टेक्स्ट स्वरुपातील जाहिरातीही बंद करण्यात येणार आहेत. व्हिडिओ चौकटीचा २० टक्के हिस्सा या जाहिरातींमुळे व्यापला जातो. त्यामुळे त्या बंद करण्यात येणार आहेत.