breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

गुन्हा दाखल झाला तरी सुद्धा अजून मेहबूब शेख ला अटक का नाही झाली? औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद: महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची सत्ता उदयास आली. पहिल्या वर्षाचा कालावधी हा अत्यंत चांगला पार पडला परंतु नंतर च्या काळात मात्र महाविकास आघाडी मधील मंत्र्यावर आणि प्रमुख नेत्यांवर मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपाचे आरोप झाले. मध्यन्तरी राष्ट्रवादी काँग्रेस युवक महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचे आणि फसवणुकीचे आरोप केले होते. यावर होणाऱ्या तपासावर आज औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. त्याबरोबरच औरंगाबाद पोलीस अधिकाऱ्यांना तपासाचे धडे देण्याची गरज असल्याचेही खंडपीठाने म्हटलं आहे .

काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबाद शहरातील 29 वर्षीय तरुणीने केला आहे . या तरुणीचे बीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. तिच्या आरोपानुसार , “ती घरगुती शिकवणी घेते. त्या तरुणीला औरंगाबाद शहरातील बायपास परिसरात शिकवणी सुरु करायची असल्याने ती तिथे खोली भाड्याने घेण्यासाठी आली. त्याठिकाणी तिची भेट बीड जिल्ह्यातील शिरुर कासारमधील महबूब इब्राहिम शेख यांच्याशी झाली. त्यानंतर शिक्षण किती झाले असं विचारुन तुला मुंबईत नोकरी लावतो असे आमिष मेहबूब शेख यांनी दाखवलं. 14 नोव्हेंबर रोजी मुंबईला जाण्याचे कारण सांगत त्या तरुणीला जालना रोडवरील हॉटेल रामगिरी समोर बोलावले. रात्री नऊच्या सुमारास रामगिरी हॉटेलसमोर पोहोचले असता मेहबूब कार घेऊन त्या ठिकाणी उभे होते. तरुणी मागील सीटवर बसवून गाडी सुरु केली. यानंतर वसंतराव नाईक कॉलेजजवळ निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून तर अत्याचार केला. याबाबत कुठे वाच्यता केली तर तुला सोडणार नाही असे म्हणून तिला कारमधून उतरवले. या घटनेनंतर तरुणीच्या मावशीने धीर दिल्यानंतर तिने सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल होऊनही मेहबूब शेख याला अटक का झाली नाही? असा प्रश्न औरंगाबाद खंडपीठाने उपस्तिथ केला आहे. या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी 2 आठवड्यात बी समरी रिपोर्ट पीडितेला द्यावा. पीडितेने 2 आठवड्यात आक्षेप नोंदवावा. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी बी समरीवरील निर्णय गुणवत्तेवर निर्णय घ्यावा, असे औरंगाबाद खंडपीठाने निर्देश दिले आहेत. आरोपीच्या अटकेसाठी पीडितेन औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button