breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आता दारूची ‘होम डिलिव्हरी’सुरू होणार? सर्वोच्च न्यायालयाने दिल्या राज्यांना सूचना

मुंबई | लॉकडाऊन दरम्यान दारूची दुकाने बंद ठेवण्याची याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मद्य विक्रीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत दारुविक्री सुरुच ठेवण्याचं म्हंटल आहे तसेच. या नियमांच जर उल्लंघन होत असेल तर दारूच्या होम डिलिव्हरीचा विचार करण्यास सांगितले आहे. दरम्यान दारुविक्रीसंदर्भात याचिकाकर्त्याच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात असे म्हटले होते की दारू दुकानांमध्ये सामाजिक अंतर पाळले जात नाही. दुकाने कमी आहेत आणि मद्य खरेदी करणारे अधिक आहेत. या कारणामुळे सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होऊ शकतो असं याचिकेत नमुद करण्यात आलं होत.

काही दिवसांपुर्वी राज्य सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्यातील तिन्ही झोनमध्ये दारुविक्री सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सोशल डिस्टेंसिंगचे पालन करून दारुविक्रेत्यांना वेळेचे बंधन घालून देण्यात आले होते. मात्र तरीही मद्यप्रेमींनी अनेक दारुच्या दुकानांवर गर्दी केल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळं सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायलयाने ही याचिका फेटाळली असून सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत दारुविक्री सुरु ठेवण्याचं म्हंटलं आहे. जर दारुच्या दुकानांवर गर्दी होत असेल तर सरकारने होम डिलिव्हरी सारख्या सुविधांचा विचार करावा असंही न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button