breaking-newsमहाराष्ट्र

नियम म्हणजे नियम… नाकाबंदीला मुख्यमंत्र्यांच्या गाडीची झाली तपासणी!

आपल्या देशामध्ये व्हिआयपी कल्चर काही नवीन नाही. बड्या व्यक्तींना सामान्यांसारखे नियम पाळावे लागत नाही असं अनेकदा दिसून येते. मात्र हळूहळू अनेक संस्था आणि अधिकारी पदावर असणारे व्यक्ती हे व्हिआयपी कल्चर कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. नुकतीच अशीच एक घटना कर्नाटकमध्ये समोर आली. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची गाडी नाकाबंदीला अडवून गाडीची तपासणी करण्यात आली.

ट्विटवर या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर बॅरिकेट टाकून कर्नाटक पोलिसांनी नाकाबंदी केलेली दिसत आहे. या नाकाबंदीमधून जाणारी प्रत्येक गाडी तपासली जात होती. याच वेळी मुख्यमंत्र्यांची गाडी या ठिकाणी आली असता या गाडीला तपासणी न करता पाठवण्याऐवजी तिला थांबवण्यात आले. व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी हे फ्रण्ट सीटवर बसलेले दिसत आहेत. कुमारस्वामी यांच्या गाडीची डीकी उघडून तपासणी करण्यात आली. मात्र कुमारस्वामी यांनी पूर्ण सहकार्य करत पोलिसांना आपले काम करु दिले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या महामार्गांवर अशाप्रकारे अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. अशाच एका नाकाबंदीच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या गाडीची पूर्ण तपासणी झाल्यानंतरच त्या गाडीला पोलिसांनी जाण्यास सांगितल्यावर ती गाडी पुढे निघाली.

Embedded video

Nagarjun Dwarakanath

@nagarjund

@hd_kumaraswamy car was checked at election check post at Hassan district today.

See Nagarjun Dwarakanath’s other Tweets

हा संपूर्ण प्रकार हसन तालुक्यामध्ये बुधवारी दुपारच्या सुमार घडल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे. व्हिआयपी कल्चर कमी करण्यासाठी देशभरातील अनेक प्रसारमाध्यमे तसेच अनेक संस्थाही प्रयत्न करताना दिसत आहे. दीड वर्षापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी गाड्यांवरील लालबत्ती काढून टाकण्याचा निर्णय घेत व्हिआयपी कल्चर कमी करण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे दिल्लीत आप सरकारनेही खाजगी रुग्णालयांमध्ये महत्वाच्या लोकांना प्राधान्य क्रम देण्याच्या नियम रद्द केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button