Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये कलांवत दडला आहे’; ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ

मुंबई : मुंबई महानगरपालिका ही कर्तव्यदक्ष संस्था आहेच. या संस्थेत जितके हुशार, कर्तव्यदक्ष कर्मचारी आहेत, तितकेच हरहुन्नरी कलाकारही या कर्मचाऱ्यांमध्ये दडलेले आहेत. दैनंदिन कामे सांभाळून आपल्यातील कला सादर करणे हे खूप मोठे आव्हान आहे. तुमच्यातील कलाकार असाच जिवंत ठेवा आणि आयुष्याचा आनंद घेत राहा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी केले.

मुंबई महानगरपालिका कामगार विभागातर्फे आयोजित ५३ व्या आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धा सन २०२४ – २५ चा पारितोषिक वितरण समारंभ महानगरपालिकेच्या विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. अशोक सराफ यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानीत करण्यात आले.. त्यावेळी ते बोलत होते.

मी अनेक कार्यक्रमांना जातो. वेगवेगळी स्नेहसंमेलने पाहतो. परंतु इतका रेखीव आणि नियोजनबद्ध कार्यक्रम मी याआधी पाहिला नाही. प्रत्येक कलाकाराच्या अभिनयामागे खूप उत्साह दिसून आला. कर्तव्याची जाणीव असलेला प्रत्येक कर्मचारी जितका आपल्या कामाला न्याय देतो, तितकाच त्याने आज या रंगमंचावर आपल्या कलेला देखील न्याय दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महानगरपालिकेच्या कामगार खात्याच्या वतीने ५३ वी आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धा ८ एप्रिल ते १६ मे २०२५ या कालावधीत मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. या नाट्यस्पर्धेसाठी प्रेमानंद गज्वी, प्रकाश बाडकर, शकुंतला नरे यांनी परीक्षकांची भूमिका बजावली.

हेही वाचा –  भारताच्या जीडीपी वाढीत घसरण : उत्पादन क्षेत्रातील मंदीनं अर्थव्यवस्थेला झटका

यंदाच्या नाट्य स्पर्धेत महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या ‘कायप्पाचा पाडा’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. मानसी जोशी यांना याच नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आणि राजा शिंगाडे यांना ‘मेला तो शेवटचा होता’ या नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आले. याशिवाय विविध गटात ३० उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली.

पारितोषिक वितरण समारंभात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या. उप आयुक्त (परिमंडळ डॉ. संगीता हसनाळे, उप आयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, माजी उप आयुक्त किशोर क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे यांनी प्रास्ताविकातून कामगार विभागाच्या वतीने कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button