Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

५ एपिसोडची लोकप्रिय हिंदी सीरिज ओटीटीवर रिलीज होताच ट्रेंडिंग, तुम्ही पाहिलीत का?

Aspirants Season 3 : ओटीटीवर या आठवड्यात काय पाहायचं, असा विचार तुम्ही करत असाल तर एका लोकप्रिय वेब सीरिजचा तिसरा सीझन रिलीज झाला आहे. ही सीरिज ओटीटीवर आल्यानंतर तीन दिवसांतच ट्रेंड करत आहे. या सीरिजचं नाव काय, त्यात कोणते कलाकार आहे आणि तिसऱ्या सीझनची कथा काय आहे, ते जाणून घेऊयात.

‘Aspirants’ ही एक लोकप्रिय भारतीय सीरिज आहे. दिल्लीतील राजेंद्र नगरमध्ये युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तीन तरुणांचा संघर्ष, त्यांचे परिश्रम, परीक्षा उत्तीर्ण करण्याचा सामाजिक दबाव व त्यांची मैत्री या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. ‘Aspirants’ आधीच्या दोन सीझनच्या यशानंतर आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये परीक्षा उत्तीर्ण केल्यावर अधिकाऱ्यांचा वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात कोणकोणती आव्हानं येतात, ते दाखवण्यात आलं आहे. ‘Aspirants’ च्या पहिल्या व दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं, आता तिसरा सीझनही रिलीज होताच ओटीटीवर ट्रेंड करू लागला आहे.

Aspirants (अॅस्पिरेंट्स) ही सीरिज १३ मार्च २०२६ रोजी प्राइम व्हिडीओवर रिलीज झाली. या सीझनमध्ये ५ एपिसोड आहेत. आता ती पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करतेय. व्हायरल फिव्हर निर्मित या सीरिजमध्ये नवीन कस्तूरिया, शिवांकित परिहार, अभिलाष थपलियाल, नमिता दुबे व सनी हिंदुजा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सीरिजची कथा अभिलाष गुरी व एसके या तीन मित्रांभोवती फिरते. हे तिघेही दिल्लीत युपीएससी परीक्षेची तयारी करत असतात.

हेही वाचा – करिअरच्या क्षितिजावर IIBM चा झेंडा!

रामपूरचा जिल्हा दंडाधिकारी (DM) म्हणून दाखवण्यात आला आहे. युपीएससीनंतर आयुष्यातील गुंतागुंत व वास्तव यावर या सीरिजमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. या सीझनची कथा प्रामुख्याने अभिलाषभोवती फिरते. एकीकडे तो व्यावसायिक आणि नैतिक आव्हानांना लढतोय, तर त्याच वेळी एका शैक्षणिक प्रकल्पावरून आपला सहकारी डीएम पवन कुमारशी सुरू असलेला संघर्षही हाताळतेय. या सर्व घडामोडींदरम्यानच, त्याला आता आपला प्रतिस्पर्धी झालेल्या ‘संदीप भैय्या’ने सुरू केलेल्या एका चौकशीलाही सामोरं जावं लागतंय.

तुम्ही Aspirants चे आधीचे दोन सीझन पाहिले असतील तर हा तिसरा सीझन ओटीटीवर ट्रेंडिंग आहे, तो तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. या सीझनचे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या भागात मैत्री, सत्ता आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांमधील संघर्ष अधिक प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button