Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

करिअरच्या क्षितिजावर IIBM चा झेंडा!

पदवी मिळण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना जहाजावर नोकरीची सुवर्णसंधी विशेष मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड : आयआयबीएम (IIBM) कॉलेज, चिखली यांच्या वतीने चिखली टाऊन हॉल येथे विद्यार्थ्यांसाठी ‘शिपिंग आणि हॉटेल इंडस्ट्रीमधील नोकरीच्या संधी’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील करिअरच्या संधींची ओळख करून दिली.

​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक डॉ. मिलिंद पेशवे (लर्निंग अँड डेव्हलपमेंट मॅनेजर, द अपोलो ग्रुप), श्री. साहिल दरेकर यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, नगरसेविका व स्थायी समिती सदस्य शितलताई धनंजय वर्णेकर, प्राचार्य प्रदीप फुलकर विभाग प्रमुख अमोल भागवत, अनिकेत वंजारी, प्रतीक्षा डफळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा –  ‘जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

​डॉ. मिलिंद पेशवे यांनी शिपवरील विविध विभाग, तेथे पोहोचण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कौशल्ये यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शिपिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेत आपली नावे नोंदवली. श्री. साहिल दरेकर यांनी फ्रंट ऑफिसमधील संधींबाबत मुला-मुलींना मार्गदर्शन केले. पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत, या उद्देशाने संस्थेने तीन महिने आधीच नोकरीचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

​याप्रसंगी , संदीप जाधव, प्लेसमेंट कॉर्डिनेटर डॉ. गरिमा मलिक, अनुभव वाजपेयी, एकता सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन कामिनी पाठक यांनी केले. ​या सेमिनारला डिग्री व डिप्लोमाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करावी. आई-वडिलांचे नाव मोठे करण्यासाठी उपलब्ध संधींचे सोने करावे. नोकरी संदर्भात कोणतीही शंका असल्यास संस्थेशी संपर्क साधावा.” तसेच त्यांनी शिक्षक व ॲडमिन स्टाफला विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या.

– डॉ. धनंजय वर्णेकर (संस्थापक अध्यक्ष, IIBM कॉलेज) .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button