ताज्या घडामोडीमनोरंजन

राज्यसभेच्या माजी सदस्या जया प्रदा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला

जया प्रदा यांच्या भावाचं निधन , सोशल मीडिवर भावूक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त

हैदराबाद : ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभेच्या माजी सदस्या जया प्रदा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जया प्रदा यांच्या भावाचं निधन झालं आहे. भावाच्या निधनानंतर जया प्रदा यांनी सोशल मीडिवर भावूक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जया प्रदा यांच्या भावाचं निधन गुरुवारी झाली आहे. सध्या जया प्रदा यांची सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

भावाचा फोटो पोस्ट करत जया प्रदा म्हणाल्या, ‘माझा मोठा भाऊ राजा बाबू यांच्या निधनाबद्दल मी तुम्हाला अत्यंत दुःखाने कळवत आहे. आज दुपारी 3.26 वाजता हैदराबाद येथे त्यांचे निधन झालं. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा… पुढील माहिती लवकरच शेअर केली जाईल.’

जया प्रदा यांच्या या पोस्टवर चाहते आणि फॉलोअर्स कमेंट करत आहेत आणि त्यांच्या भावासाठी प्रार्थना करत आहेत. त्यांच्याप्रती शोक व्यक्त केला. जया यांनी बॉलिवूडसोबतच साऊथमध्येही काम केलं आहे. एवढंच नाही तर, एन चंद्राबाबू यांच्या पक्षाकडून निवडणूकही लढवली आहे. मुंबईशिवाय त्या हैदराबादमध्ये राहते.

हेही वाचा  :  इस्लामिक राष्ट्राची पेरणी : काय आहे वक्फ बोर्ड? महाराष्ट्रात कधी झाली वक्फची स्थापना? वाचा! 

जया प्रदा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून त्या बॉलिवूडपासून दूर आहेत. काही दिवसांपूर्वी जया प्रदा ‘सा रे गा मा पा’ शोमध्ये दिसल्या होत्या. शोमध्ये जया प्रदा यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या. शोमधील स्पर्धक बिदिशा हिने ‘मुझे नौलखा मंगा दे रे’ आणि ‘डफली वाले डफली बजा’ गाणं गायलं.

बिदिशा हिच्या परफॉर्मेन्सवर प्रभावित होत, त्यांनी ‘डफली वाले डफली बाजा’ सिनेमातील जुन्या आठवणी ताज्या केल्या. जया प्रदा म्हणाल्या, ‘मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण तू ज्या पद्धतीनं गाणं गायलं आहे त्यामुळे आज मला लतादीदींची आठवण झाली आहे. तू खरोखर आश्चर्यकारक आहेस. खरं तर, मी म्हणायलाच पाहिजे की हे गाणं गाणं सोपं नाही, परंतु तू ते खूप चांगले गायलं आहे…’ , जया प्रदा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button