रश्मिका मंदनाने गुपचूप लग्न उरकलं! कोणासोबत अडकली विवाहबंधनात?

Rashmika Mandanna : दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदनाने खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. मी विवाहित असल्याचं रश्मिकाने म्हटलं आहे. ती एका मुलाखतीत बोलत होती. एवढंच नाही तर, गुपचूप लग्न केल्याचा मोठा खुलासा रश्मिकाने केला आहे.
रश्मिका हिचे नाव अभिनेता विजय देवरकोंडा यांच्यासोबत जोडलं जात आहे. त्यांच्या डेटींगच्या अनेक गोष्टी कायम चाहत्यांच्या समोर येत असतात. पण आता अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. मी विवाहित आहे. मी एनीमे कॅरेक्टर नरूटो याच्यासोबत गुपचूप लग्न केलं आहे, असं रश्मिका मंदनाने म्हटलं आहे.
हेही वाचा – Chandrayaan-३ साठी आज महत्त्वाचा दिवस! चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार
दरम्यान, रश्मिका अभिनेता रणबीर कपूर यांच्यासोबत ‘एनिमल’ सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तर दुसरीकडे अभिनेता विजय देवकोंडा ‘कुशी’ सिनेमात अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. १ सप्टेंबर रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.





