Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राहुल गांधींवर कारवाई होते मग भिडे वर का कारवाई नाही? राजू शेट्टी

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनाव प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करवा अशी मागणीही केली आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, राहुल गांधी यांच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर हाय कोर्टाच्या कार्यपद्धतीबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. आपण महापुरूषांची पूजा करतो. येशू, ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, महात्मा गांधी साऱ्या जगाचे दैवत आहेत. यांच्याबद्दल अपशब्द काढणे चूक आहे. सगळे मोदी चोर म्हटल्यावर राहुल गांधींवर कारवाई होते मग भिडेंवर का कारवाई होत नाही.

हेही वाचा – रश्मिका मंदनाने गुपचूप लग्न उरकलं! कोणासोबत अडकली विवाहबंधनात?

एनडीए आणि ‘इंडिया’ मध्ये न जाता स्वतंत्र तिसरी आघाडी घेऊन आम्ही लढणार आहोत. मोठ्या पक्षांनी धंदेवाईक राजकारण केलेलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चळवळीचे प्रश्न घेऊन लढणारे आणि आम्ही आमचं वेगळं व्यासपीठ तयार केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव आल्यास त्यांना सोबत घेण्याचा विचार करू, असंही राजू शेट्टी म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button