breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

Chandrayaan-३ साठी आज महत्त्वाचा दिवस! चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार

Chandrayaan-३ : संपुर्ण जगाचे लक्ष असलेल्या चंद्रमोहिमेकडे लागलं आहे. भारताने अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने १४ जुलै रोजी सोडलेले ‘Chandrayaan-३’ साठी आज महत्वाचा दिवस आहे. आज संध्याकाळी ७ वाजता हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) सांगितले की, या अंतराळयानाने दोन तृतीयांश प्रवास पूर्ण केला आहे. १४ जुलै रोजी निघालेले वाहन आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. लॉन्च झाल्यापासून या यानाची कक्षा पाच वेळा बदलण्यात आली आहे. १ ऑगस्ट रोजी फेरीनंतर हे यान पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने निघाले.

हेही वाचा – ‘पवना धरण भरल्याने दररोज पाणीपुरवठा सुरू करावा’; माजी नगरसेविका सीमा सावळे 

इस्रोने असेही सांगितले की, ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. जेव्हा त्याची अभिप्रेत कक्षा चंद्राच्या सर्वात जवळ असेल, तेव्हा वाहन चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. या प्रक्रियेला Lunar Orbit Injection (LOI) म्हणतात.

यानंतर हे यान पुढील काही दिवस चंद्राच्या कक्षेत फिरेल. हळूहळू बदल करून हे यान चंद्राच्या जवळच्या कक्षेत आणले जाईल. तसेच हे यान पूर्णपणे वेळापत्रकानुसार प्रगती करत आहे. २३ ऑगस्ट रोजी या वाहनाचे लँडर-रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button