Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

‘पोपटराव पवार काम करतात, मात्र अमिर खान क्रेडीट घेऊन जातो’; महेश मांजरेकरांचं मोठं विधान

मुंबई : मराठी अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर आपल्या विधानामुळे सातत्याने चर्चेत असतात. दरम्यान, त्यांनी पाणी फाऊंडेशन आणि अमिर खान यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे. पोपटराव पवार काम करतात, मात्र क्रेडीट अमिर खान घेऊन जातो, असं महेश मांजरेकर म्हणाले. ते ‘अस्वस्थ मनाच्या व्यथा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

महेश मांजरेकर म्हणाले की, पोपटराव पवार यांना भेटण्याची माझी खूप इच्छा होती. मला त्यांच्या गावीदेखील जायचं आहे. त्यांचं काम खूप मोठं आहे. पोपटराव पवार यांना ‘पद्मश्री’ मिळाला याचा मला फार आनंद झाला नाही. खरंतर त्यांना ‘पद्मभूषण’ मिळायला हवा होता. पोपटराव पवार यांचं काम पद्मश्रीच्या पलीकडचे आहे. पोपटराव पवार हे खूप मोठं काम करतात मात्र क्रेडिट हे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अमिर खान घेऊन जातो.

हेही वाचा – ‘शरद पवार बेकायदेशीरपणे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष झालेले’; सदाभाऊ खोत यांची खोचक टीका

कोरोना व्हायरल आपल्यातच आहे तो कुठेही गेलेला नाही. दरम्यान, आपण सर्वांनी जी व्हॅक्सीन घेतली त्या व्हॅक्सीनने काहीही झालेलं नाही. उलट त्रासच जास्त झाला आहे. तुम्हालाही ते हळूहळू कळेल. कोरोना काळात थोडीशी जास्त काळजी घेतली असती तर कमी लोकांचं निधन झालं असतं, असंही महेश मांजरेकर म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button