Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

गणेश मंडपासाठी रस्ते खोदल्यास दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करू नये; एकनाथ शिंदे यांचे पालिका आयुक्त यांना निर्देश

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रत्येक खड्ड्यामागे वीस हजार रुपये दंड आकारण्यात येणार होता. महापालिकेच्या या निर्णयाला सार्वजनिक गणेशोत्सवा मंडळांच्या वतीने होत असलेल्या विरोधानंतर राज्य सरकारकडून आता मुंबई महानगरपालिकेला रस्ते खोदल्यास दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करू नये असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या (रस्ते पुनर्स्थापना शुल्क) रकमेत कोणतीही वाढ करू नये, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहेत.

हेही वाचा –  निगडी – प्राधिकरणातील वृद्ध उद्योजकाच्या बंगल्यातील दरोड्याचा पर्दाफाश

गणेशोत्सवासाठी मंडळांनी मंडप उभारण्यासाठी खड्डा खोदल्यास नव्या नियमावलीनुसार एका खड्ड्यासाठी १५,००० रुपये शुल्क आकारण्यात येणार होते. याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने वाढीव दंड रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करु नये, असे निर्देश दिले आहेत. आता जुन्या नियमानुसार केवळ २,००० रुपये शुल्क आकारले जाईल. मुंबईतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण होत आहे. मंडळांनी काँक्रीटचे रस्ते न खोदता मंडप उभारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सकारात्मक विचार करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मंडळांना केले. या निर्णयाचे स्वागत करत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अँड. नरेश दहिबावकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे जाहीर आभार मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button