breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘शरद पवार बेकायदेशीरपणे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष झालेले’; सदाभाऊ खोत यांची खोचक टीका

मुंबई : रयत क्रांती संघनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. जिथे पैसा तिथे पवार घराणं असतं. पैसा मिळाला की ते कशाचेही अध्यक्ष होतात, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. ते सोलापुरात बोलत होते.

सदाभाऊ खोत म्हणाले की, शरद पवार म्हणले मी गुगली टाकली कारण, मी क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. मुळात ते बेकायदेशीरपणे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष झाले होते. ज्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करता येतं, त्याने क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष असावं. पण, शरद पवारांना काहीच येत नाही, तरीही ते अध्यक्ष झाले.

हेही वाचा – मणिपूर हिंसाचारवर राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, ठोस पावलं उचला..

शरद पवार कुस्ती संघटनेचेही काही काळ अध्यक्ष होते. पण त्यांनी कधी कुस्त्या गाजवलेल्या किंवा हिंदकेसरी पुरस्कार मिळाल्याचं, माझ्या ऐकण्यात नाही. मात्र, जिथे पैसा तिथे पवार घराणं. पैसा मिळाला की ते कशाचेही अध्यक्ष होतात, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

शरद पवारांनी गुगली टाकली नव्हती तर महाभारतात शकुनीमामा डाव टाकून जसे पांडवांचं राज्य हिरावून घेतो. त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या महाभारतातील शकुनीमामा म्हणजे शरद पवार आहेत. त्यांनी शकुनीमामा सारखेच सोंगाट्याचा डाव खेळला होता आणि भाजपा शिवसेनेचं सरकार घालवलं होतं, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button