ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

गोविंदा आणि सुनीताचा ग्रे डिवोर्स? नक्की काय आहे संकल्पना

गोविंदा आणि सुनीता लग्नाच्या ३७ वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडचा हीरो नंबर वन गोविंदा भलेही रुपेरी पडद्यापासून लांब असला तरी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला आहे. आता अभिनेत्याविषयी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोविंदाच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. गोविंदा आणि सुनीता लग्नाच्या ३७ वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत. या बातमीने चाहत्यांना धक्काच बसला आहे. गोविंदा आणि सुनीताचा ग्रे डिवोर्स होत आहे. आता ही ग्रे डिव्होर्स संकल्पना काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला जाणून घेऊया…

सुनीता आणि गोविंदा हे गेल्या कित्येक वर्षांपासून वेगवेगळे राहात आहेत. नुकताच सुनीताने गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवल्याचे देखील समोर आले आहे. लग्नाच्या ३७ वर्षांनंतर दोघे वेगळे होत असल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. गोविंदा ६१ वर्षांचा आहे तर सुनीता ५७ वर्षांची. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाला ग्रे डिव्होर्स असे म्हणत आहेत.

ग्रे डिव्होर्स म्हणजे काय?

ग्रे डिव्होर्स म्हणजे नवरा आणि बायकोचे वय ५० पेक्षा जास्त आहे आणि दोघांच्या लग्नाला बरीच वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच नवरा बायको ऐन उतारवयात घटस्फोटाचा निर्णय घेत आहेत या संकल्पनेला ‘ग्रे डिव्होर्स’ असे म्हणतात. दोघांनी एकमेकांसोबत अर्ध आयुष्य जगले आहे. त्यामुळे गोविंदा आणि सुनीताचा जर घटस्फोट झाला तर तो ग्रे डिवोर्स म्हणून ओळखला जाईल.

हेही वाचा  : दिल्ली विधानसभेत आमदारांचा गदारोळ, आपच्या १२ आमदारांचं निलंबन 

सुनीताने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ती गोविंदासोबत राहत नाही. सुनीताने सांगितले होते की ते बऱ्याच वेळा वेगळे राहतात. सुनीता एका फ्लॅटमध्ये मुलांसह राहते. तर गोविंदा फ्लॅटसमोरील बंगल्यात राहतो. याशिवाय सुनीता म्हणाली होती की, ‘कोणत्याही माणसावर कधीही विश्वास ठेवू नका.

लोक सरड्यासारखे रंग बदलतात. आमच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. तो कुठे जाईल? पूर्वी मी कुठेही जात नसे आणि आता मला माहित नाही…’ सुनीता म्हणाली पुढे म्हणाली होती की मी पूर्वी खूप सुरक्षित होते. पण मी आता नाही. वयाची साठी ओलांडल्यानंतर लोक विचित्र वागायला लागतात. गोविंदाची ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. तो काय करतोय कुणास ठाऊक. मी गोविंदाला सांगितले की तू ६० वर्षांचा झाला आहेस, हट्टी होऊ नकोस. पण तो काही ऐकत नाही.’

गोविंदा आणि सुनीताने १९८७ साली लग्न केले होते. दोघांनीही अगदी कमी वयात लग्न केले होते. त्यावेळी सुनीला केवळ १८ वर्षांची होती. सुनीता आणि गोविंदाला दोन मुले आहे. मुलीचे नाव टीना आहे तर मुलाचे नाव यशवर्धन आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button