सरकारी कंपनीच्या ऑफरने गजहब, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा
भारत पेट्रोलियमचा स्थापना दिवसाचे औचित्य साधून ऑफर सुरू

मुंबई : महागाईचा गेल्या काही वर्षांपासून कहर आहे. भाजीपाल्यापासून तर डाळधान्यापर्यंत अनेक वस्तू महागल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलने तर काही वर्षांपूर्वी ग्राहकांच्या खिशाला तडाखा दिला आहे. या किंमती सध्या स्थिर आहेत. पण या पेट्रोलियम कंपनीने एकदम खास ऑफर आणली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर लांबच लांब रांग लागली आहे. काय आहे ही ऑफर, किती रुपयांचे मिळते मोफत पेट्रोल?
काय आहे ऑफर?
सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार ऑफर सुरू आहे. जर तुम्ही दुचाकी चालवत असाल तर तुम्हाला 75 रुपयांचं पेट्रोल मोफत मिळेल. कंपनीची ही ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंत चालेल. कसा मिळेल या ऑफरचा फायदा, जाणून घ्या.
भारत पेट्रोलियमचा स्थापना दिवसाचे औचित्य साधून ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. या ऑफरचा 28 फेब्रुवारी 2025 रोजीपर्यंत लाभ घेता येईल. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावे. कंपनीचे कर्मचारी, डीलर्स, वितरक, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय यांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. तर ज्या राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशात या ऑफर्सवर कायदेशीर बंदी आहे, तिथे सुद्धा तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार नाही.
हेही वाचा : दिल्ली विधानसभेत आमदारांचा गदारोळ, आपच्या १२ आमदारांचं निलंबन
कसे मिळणार 75 रुपयात मोफत पेट्रोल?
भारत पेट्रोलियमच्या या ऑफरसाठी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक पेट्रोल पंपावर नोंदवावा लागेल. या योजनेत भाग्यवानांना जवळपास 1000 रुपयांचा कॅशबॅक पण मिळू शकतो. ही ऑफर माहिती झाल्याने अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारक याविषयीची विचारणा करत आहे.
या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना भारतीय पेट्रोल पंपावर पेट्रोल सोबतच MAK 4T इंजिन ऑईलचे कमीत कमी एक पॅक खरेदी करावे लागते. इंजिन ऑईल खरेदी करताच ग्राहकांना 75 रुपयांचे पेट्रोल मोफत आणि त्वरीत मिळेल.
इंजिन ऑईल तुम्ही मोफतपणे पेट्रोल पंपावर बदलवू शकता. इतकेच नाही. तर इंजिन ऑईलच्या डब्ब्यावर एक क्युआर कोड असेल तो स्कॅन केल्यावर 1,000 रुपयांपर्यंत कॅशबॅकचा फायदा सुद्धा होऊ शकतो. एका मोबाईल क्रमांकवर या ऑफरचा एकदाच लाभ घेता येईल. एकदा ऑफरचा फायदा घेतल्यावर पुन्हा दुसऱ्या पेट्रोल पंपावर तुम्हाला ऑफरचा फायदा घेता येणार नाही.