निगडी येथे पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया
‘त्या’ ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड : निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी ड्रिल मशीन पोकलॅण्ड ने रस्त्यावर बोरिंग खोदण्यात येत असताना त्या ठिकाणी पाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.
या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन मेट्रो रेल्वे ठेकेदार ह्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे.
हेही वाचा : ‘नमो किसान सन्मान निधी योजनें’तर्गत ३ हजार रुपये वाढविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी ड्रिल मशीन पोकलॅण्डने रस्त्यावर खड्डे खोदताना पाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. सध्या उन्हाळा सुरू असून शहरात पाण्याचा तुटवडा भासत असल्याने मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया गेले आहे, त्या संदर्भात ताबडतोब दखल घेऊन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.