ताज्या घडामोडीमनोरंजन

“सर्व काही सोडून साध्वी बनेल….” : अभिनेत्री युविका चौधरी

आणखी एक स्टार अभिनेत्री साध्वी बनण्याच्या मार्गावर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने सांसारिक आसक्ती सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. तिच्यासारख्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी साध्वी मार्गाने आपलं जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीनेही साध्वी होण्याच्या निर्णयाबद्दल बोलून दाखवलं आहे. ही अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव आहे. तसेच तिचा पतीही एक प्रसिद्ध अभिनेता आहे. सर्व काही सोडून साध्वी होण्याबाबतची तिची इच्छा या अभिनेत्रीने सांगितली आहे.

या अभिनेत्रीने घेतला साध्वी होण्याचा निर्णय

ही अभिनत्री टीव्ही शहरातील लोकप्रिय अभिनेत्री युविका चौधरी सध्या चर्चेत आहे. तिने केलेल्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. युविका चौधरी एक मोठी टीव्ही अभिनेत्री आहे. ती अनेक वर्षांपासून टीव्हीवर काम करत आहे आणि अनेक चित्रपटांमध्येही काम करत आहे. युविका आता इंडस्ट्री सोडून व्लॉगिंगमध्ये आली आहे. काही महिन्यांपूर्वी ती एका मुलीची आई झाली. ती तिच्या मुलीचे संगोपन करण्यात व्यस्त आहे आणि उरलेल्या वेळेत ती व्लॉगिंगही करते. युविका पूर्णवेळ व्लॉगर बनली आहे. मग तिने एका मुलाखतीत साध्वी होण्याबद्दलची इच्छा का बोलून दाखवली असाच सर्वांना प्रश्न पडला आहे.

हेही वाचा   :   पालखी मार्गावरील अडथळे दूर करा; पुणे महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

“सर्व काही सोडून साध्वी बनेल….”

युविका चौधरी तिच्या चाहत्यांना व्लॉगद्वारे तिच्या आयुष्यातील अपडेट्स देत असते. चाहत्यांनाही तिच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. युविका एकदा पारस छाबरा यांच्या पॉडकास्टमध्ये गेली होती. जिथे पारसने तिला त्याच्या कुंडलीबद्दल विचारले होते. तिच्या कुंडलीतील गुपिते उलगडताना पारस म्हणाला होता- तुमच्या कुंडलीत असा योग आहे की तुम्ही लवकरच संत होणार आहात. यावर उत्तर देताना युविका म्हणाली होती- ‘फार लवकर नाही. पण माझ्या आयुष्यात असा एक काळ येईल जेव्हा मी माझे जीवन सेवेसाठी समर्पित करेन. सध्या मी फक्त माझ्यापुरती धार्मिक आहे. काही काळानंतर, मी ठरवलं आहे की मी सर्वकाही सोडून देईन आणि स्वतःला पूर्णपणे सेवेत समर्पित करेन. सर्व काही सोडून साध्वी बनेल. मी याबद्दल आधीच विचार केला आहे.”

“तुम्ही नातेसंबंधांना आणि जीवनाला जास्त महत्त्व देता…”

युविका पुढे म्हणाली “सांसारिक जीवन जगणे देखील खूप महत्वाचे आहे. तुम्ही त्याच्याकडून खूप काही शिकता. यामुळे तुमच्या आत एक चांगला बदल होतो. आई झाल्यानंतरही मी बदलले आहे. तुम्ही नातेसंबंधांना आणि जीवनाला जास्त महत्त्व देता. संघर्षाशिवाय जीवनात पुढे जाणे शक्य नाही.” असं मतही तिने व्यक्त केलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button