ज्योतीच्या टार्गेटवर ‘हे’ प्रसिद्ध मंदीर
सुल्तानगंज येथील सुप्रसिद्ध अजगैबीनाथ मंदिराला भेट

राष्ट्रीय : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला एनआयएने अटक केले आहे. सध्या एनआयएकडून तिची कसून चौकशी केली जात आहे. याच चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. ज्योती मल्होत्राने फक्त जम्मू-काश्मीरच नव्हे तर भारतातील इतरही काही ठिकाणांना भेट दिली आहे. यामध्ये बिहारच्या एका मंदिराचा समावेश आहे. ज्योतीने त्या मंदिराला अनेकदा भेट दिल्याचं समजताच त्या मंदिराची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे.
चार वेळा दिली मंदिराला भेट
ज्याती मल्होत्राने 2023 साली भागलपूर येथील सुल्तानगंज येथील सुप्रसिद्ध अजगैबीनाथ मंदिराला भेट दिली होती. विशेष म्हणजे फक्त एक वेळा नव्हे तर ती तब्बल चार वेळा या मंदिरात गेलेली आहे. त्यामुळेच तपास यंत्रणा सतर्क झाली आहे. ही बाब समोर आल्यानंतर या मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. श्रावण महिन्यात या मंदिरात देवदवर्शनासाठी देशभरातून श्रद्धाळू येतात. ज्योती मल्होत्राने याच मंदिर परिसराची रेकी केली असावी, अशी शक्यता लक्षात घेऊन तेथील सुरक्षा वाढवलेली आहे.
हेही वाचा : पालखी मार्गावरील अडथळे दूर करा; पुणे महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश
भागलपूर पोलीस, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर
ज्योती मल्होत्राने भागलपूरला भेट दिल्याचे समोर येताच तेथील पोलीस तसेच तेथील तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ज्योती या भागात आल्यानंतर कोणा-कोणाला भेटली, तिचा कोणाशी संपर्क होता तसेच काही आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे का? या सर्व बाबींचा सध्या यंत्रणा तपास करत आहे. बिहारमधील अनेक शहरांत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, आतापर्यंत एनआयए, आयबी तसे हरियाणा पोलिसांनी तिची चौकशी केली आहे. या चौकशीतून आतापर्यंत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अजूनही भविष्यात काही गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. तिची डायरीही तपास यंत्रणेला मिळाली असून त्यातूनही काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.