ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

सोनाक्षी सिन्हा सासरच्यांविषयी झाली व्यक्त

''मी खरंच नशीबवान आहे की माझ्या सासरच्यांकडून असा काही दबाव नाही''

मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने जून महिन्यात झहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्न केलं. या लग्नाला सोनाक्षीच्या घरातून विरोध असल्याचं म्हटलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर लग्नानंतर सोनाक्षीच्या भावाने सोशल मीडियावर काही अप्रत्यक्ष पोस्टसुद्धा लिहिले होते. या पोस्टद्वारे त्याने सोनाक्षीच्या सासरच्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी तिच्या सासरच्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. लग्नानंतर तिच्यावर जेवण बनवण्याचा आणि घरातील इतर कामं करण्याचा दबाव टाकला जातोय का, या प्रश्नाचं उत्तर सोनाक्षीने दिलंय.

हल्ली लग्नानंतर महिलांवर जेवण बनवण्याचा दबाव नाही, कारण प्रत्येकाला माहितीये की आता महिलांना बाहेर जाऊन कामसुद्धा करावं लागतं आणि घरसुद्धा सांभाळावं लागतं. हा प्रत्येकाच्या इच्छेचा विषय आहे. मी खरंच नशीबवान आहे की माझ्या सासरच्यांकडून असा काही दबाव नाही. जरी मी पुढाकार घेऊन जेवण बनवलं तरी ते माझ्या इच्छेनुसारच असतं. त्यात कोणाचाही दबाव नसतो, असं सोनाक्षीने सांगितलं. एका डिजिटल ट्रॅव्हल कंपनीच्या प्रमोशनल कार्यक्रमात सोनाक्षी बोलत होती. या कार्यक्रमात सोनाक्षीसोबत तिचा पती झहीरसुद्धा होता.

स्वयंपाकाशी संबंधित या कार्यक्रमात सोनाक्षीने सत्तूचा पराठा आणि झहीरने अवाकाडो सुशी हे पदार्थ बनवले होते. यावेळी सोनाक्षी म्हणाली की ती पहिल्यांदाच असा काही पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतेय आणि तिचे हे प्रयत्न पाहून आईला फार आनंद होईल. खरंतर असं काहीतरी बनवण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे आणि तेसुद्धा थेट इतक्या लोकांसमोर. मी खूप दबावाखाली होते, पण माझ्या मते मी ठीकठाक बनवतेय. स्वयंपाक करताना मी खूप एंजॉय केलंय. भविष्यात मी आणखी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करेन, अशा शब्दांत सोनाक्षी व्यक्त झाली.

मला असं स्वयंपाक बनवताना पाहून सर्वांत आधी माझी आईच खूप खुश होईल. माझी आई सुगरण आहे. तिला असं वाटलं होतं की तिची मुलगी खूप चांगली शेफ बनेल पण ते कधीच शक्य झालं नाही. जेव्हा मी लग्न करेन तेव्हा मी खूप चांगली शेफ बनेन असं तिला वाटलं होतं. पण असं काही घडण्याची ती अजून प्रतीक्षाच करतेय, असं सोनाक्षी मस्करीत म्हणाली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button