अभिनेता सैफअली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारीला हल्ला करण्यात आला. या हल्ला प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिस कसून तपास करत असून दिवसेंदिवस नवी माहिती समोर येत आहे. आरोपी मोहम्मद शहजाद याला १९ जानेवारीला अटक करण्यात आली होती, तेव्हापासून तो पोलिस कोठडीमध्ये होता. आता त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीवन कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा : चऱ्होलीमधील मुलांची नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये नेत्रदीपक कामगिरी!
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात हल्लेखोर मोहम्मद शहजाद याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बुधवारी वांद्रे येथील न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.पोलिसांनी आरोपीची तीन दिवस तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून मागितलेली होती, मात्र वांद्रे येथील न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.