Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

खुशखबर! तारक मेहतामध्ये होणार दया बेनची एण्ट्री

गेल्या १२ वर्षांपासून छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचे नुकताच ३००० हजार एपिसोड पूर्ण झाले आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी अशी ओळख आहे. आता गेल्या काही दिवासांपासून मालिकेपासून लांब असणारी दया बेनची मालिकेत पुन्हा एण्ट्री होणार असल्याचे समोर आले आहे.

एकीकडे येत्या दिवाळीत किंवा दिवाळीच्या आधी दया बेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी मालिकेत कमबॅक करणार असल्याचे म्हटले जात आहे. दिशा वकानीची मालिकेत पुन्हा एण्ट्री होणार असल्याने चाहते आनंदी झाल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे दिशा वकानीने मालिकेस नकार दिला तर दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button