Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

रणवीर सिंहला बिश्नोई गँगची धमकी; १० कोटींची खंडणी मागणी

मुंबई | बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला बिश्नोई गँगकडून धमकी देत १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही धमकी व्हॉईस नोटच्या माध्यमातून देण्यात आली असून संबंधित मेसेज अमेरिकन नंबरवरून पाठवण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या प्राथमिक तपासात, बिश्नोई गँगचा कथित हस्तक ‘हॅरी बॉक्सर’ने रणवीर सिंहला धमकी दिल्याचे समोर आले आहे. रणवीर सिंहच्या मॅनेजरच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या व्हॉईस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरचाच असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून याबाबत इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा     :            ‘पैशांचा विषय येताच दोन्ही देश थांबले’; भारत-पाक संघर्षावर ट्रम्प यांचे विधान      

पोलिसांच्या माहितीनुसार, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर ही धमकी पाठवण्यात आली होती. रणवीर सिंहच्या मॅनेजरच्या मोबाईलवर आलेल्या या व्हॉईस नोटनंतर अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचने मॅनेजरचा जबाब नोंदवून तपास सुरू केला आहे. अद्याप या प्रकरणात अधिकृत एफआयआर नोंदवण्यात आलेला नसून प्राथमिक चौकशी सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बिश्नोई गँग बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना लक्ष्य करत असल्याचे दिसत आहे. रणवीर सिंहपूर्वी सलमान खान, कपिल शर्मा, पवन सिंग आणि रोहित शेट्टी यांनाही धमक्या देण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित सेलिब्रिटींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणावर रणवीर सिंहने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button