breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

निवडणूक विभाग सज्ज : सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महापालिका निवडणूक इच्छुकांचे लक्ष!

पिंपरी: पिंपरी- चिंचवड महापालिकेची आगामी निवडणुका कधी होणार, याबाबत संभ्रम आहे. मात्र, कधीही निवडणुका लागू शकतात. त्यादृष्टीने निवडणूक विभागाची जोरदार तयारी सुरु आहे. ईव्हीएम मशीनची दुरुस्ती, प्रभागनिहाय मतदार यादी विभाजान, आरओ ऑफिसची ठिकाणे निश्चित करण्याचे काम निवडणूक विभागाचे सुरु आहे. 4 मे रोजीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने प्रभाग रचनेच्या अधिकाराबाबत राज्य शासनाचा कायदा रद्द केल्यास कधीही निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे निवडणूक विभागाची लगबग सुरु आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासनाने 2022 च्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना केली. 3 सदस्यांचे 45 आणि 4 सदस्यांचा 1 प्रभाग केला. त्यातून 139 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यानुसार तयार केलेला प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा 1 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केला. या प्रभाग रचनेवर हरकती मागवून त्यावर सुनावणीही घेतली. सुनावणीचा अहवाल निवडणूक आयोगालाही पाठविला. प्रभागरचना अंतिम होणे शिल्लक आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर निवडणुकांचे अधिकार राज्याने विशेष कायदा पारित करत स्वतःकडे घेतले. त्यानंतर राज्यातल्या विविध महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात 13 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button