breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus | कोरोनाला रोखण्यासाठी मलेरियाचं औषध सज्ज, ICMR ची मंजुरी

नवी दिल्ली | कोरोना विषाणूने संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने मलेरिया तापाच्या उपचारासाठी वापरली जाणाऱ्या औषधाचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) स्थापन केलेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सने कोविड – 19 च्या उपचारासाठी मलेरियावरील औषध हायड्रॉक्सी-क्लोरोक्विनला मंजुरी दिली आहे.

संशयित किंवा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असलेल्यांसाठी आरोग्य मंत्रालयाने एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. ही माहिती सरकारने पत्रकार परिषदेत दिली. आयसीएमआरचे महासंचालक बलाराम भार्गव म्हणाले की, कोरोना विषाणू संशयित किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचार करत असलेले आरोग्य कर्मचारी किंवा त्यांच्या संपर्कात असलेल्या संसर्गाची अति जोखीम असलेल्यांना हायड्रॉक्सी-क्लोरोक्विन देण्यात यावे.

नॅशनल टास्क फोर्स द्वारे शिफारस करण्यात आलेल्या या ट्रीटमेंट प्रोटोकॉलला जनरल कंट्रोलर ऑफ इंडियानेही मान्यता दिली आहे. मात्र, या औषधाचा उपयोग आपातकालिन परिस्थितीत मर्यादित प्रमाणातच करता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button