breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 11 लाखांचा दारुसाठा जप्त

पिंपरी / महाईन्यूज

सांगवी, भोसरी, दिघी, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापा मारून अवैध दारुसाठा जप्त केला आहे. या कारवाईत 10 लाख 86 हजार रुपयांचा दारुसाठा ताब्यात घेतला आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथक, सामाजिक सुरक्षा पथक, गुन्हे शाखा युनिट पाच आणि स्थानिक पोलिसांनी केली आहे.

सांगवी परिसरातील गणेश नगर येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारला. या कारवाईत एका दुचाकीस्वाराकडून 27 हजार 670 रुपयांचा दारूसाठा जप्त केला. अतुल वसंत टेकाळे (वय 35, रा. नवी सांगवी) याच्याविरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी बालाजीनगर परिसरातून 1 हजार 700 रुपये किमतीची हातभट्टीची दारू जप्त केली. याप्रकरणात पप्पू धर्मा वाघमारे (वय 35, रा. बालाजीनगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिघी पोलिसांनी दोन ठिकाणी छापेमारी करत दोघांवर गुन्हा दाखल केला. पहिल्या प्रकरणात 3 हजार 326 रुपयांच्या देशी दारू आणि बिअरच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. तर, दुसऱ्या प्रकरणात चार हजार 434 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली. पहिल्या कारवाईमध्ये दोघांना अटक करून त्यांच्याकडून 10 हजार 180 रुपये किमतीच्या 62 बिअरच्या आणि दारूच्या बाटल्या जप्त केल्या. दुसऱ्या कारवाईत दोन हजार चाळीस रुपये किमतीच्या 12 बिअरच्या बाटल्या जप्त केल्या. दुसऱ्या कारवाईमध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली. या दोन्ही कारवाया देहूरोड परिसरात करण्यात आल्या आहेत.

देहूरोड परिसरात सामाजिक सुरक्षा विभागाने एक कारवाई केली. त्यात पोलिसांनी देशी विदेशी दारूच्या बाटल्या आणि एक कार असा एकूण 10 लाख 36 हजार 188 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button