breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! राममंदिर आणि शिवजयंतीनिमित्त मिळणार आनंदाचा शिधा मोफत

मुंबई | २२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी संपुर्ण देशात दिवाळी साजरे करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीप्रमाणे राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिदा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. शिवजयंती आणि राम मंदिराच्या निमित्ताने आनंदाचा शिधाचं वाटप केला जाणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वापूर्ण निर्णय :

राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.

ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी.

‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी.

हेही वाचा    –    लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत आहात? जाणून घ्या किती खर्च येईल

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी.

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना ५० हजारांवरून एक लाखांपर्यंत अनुदान करण्यास मान्यता.

गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button