breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचार करताय? या कार आहेत सर्वात बेस्ट

Electric Vehicle | भारतात इलेक्ट्रिक कारची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. नवनवीन इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच होत आहेत. आज आपण ५ बजेट फ्रेंडली ईव्हीबद्दल जाणून घेऊया..

MG Comet EV : MG Comet EV ही कार सिंगल चार्जमध्ये २३०kmपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. यात ४१bhp पॉवर देण्यात आली आहे. या कारच्या बेस मॉडेलची किंमत ७.९८ लाख रुपये आहे. MG Comet EV कारमध्ये १७.३kWhचा बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी १११Nm टॉर्क जनरेट करते.

Tata Tiago EV : टाटाची Tata Tiago EV लोकप्रिय आहे. कंपनीची ही हॅचबॅक कार XE, XT, XZ+ आणि XZ+ Tech Lux या चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये १९.२kWh आणि २४kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही कार ३१५ किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. या कारच्या बेस मॉडेलची किंमत ८.६९ लाख रुपये आहे.

हेही वाचा   –   राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! राममंदिर आणि शिवजयंतीनिमित्त मिळणार आनंदाचा शिधा मोफत 

Citroen eC3 : Citroen eC3 ही कार ११.६१ लाख रुपयांना विकली जात आहे. कारचे टॉप मॉडेल १२.९९ लाख रुपये आहे. या नवीन कारमध्ये १०.२ इंच टचस्क्रिन सिस्टीम आहे. एका चार्जमध्ये ही कार ३२० किमी पर्यंतची रेंज देते. या कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध आहे. ही कार २९.२kWh बॅटरीसह सादर केली जात आहे.

Tata Tigor EV : Tata Tigor EV ही ५ सीटर कार आहे. या कारच्या बेस मॉडेलची किंमत १२.४९ लाख रुपये आहे. ही कार ३१५ किमी ड्रायव्हिंग रेंज देते. या कारमध्ये २६kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे.

Tata Nexon EV : Tata Nexon EV ही कार क्रिएटिव्ह+, फियरलेस, फियरलेस+, फियरलेस+एस, एम्पॉवर्ड आणि एम्पॉवर्ड+या सहा प्रकारांमध्ये येते. या कारची एक्स शोरुम किंमत १४.७४ लाख रुपये आहे. या एसयूव्ही कारमध्ये १६ इंची अलॉय व्हिल देण्यात आले आहे. या कारमध्ये ३०kWh बॅटरी आहे. ही कार १२७bhp पॉवर आणि ४६५ ड्रायव्हिंग रेंज देते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button