breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

तोशखाना प्रकरणी इमरान खान यांना पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी; कायदेशीर कारवाई होणार?

लाहोर । महाईन्यूज। वृत्तसंस्था।

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मोठा झटका दिला आहे. इम्रान खान यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे. तोशखाना प्रकरणी निवडणूक आयोगाने इम्रान खान यांची खासदारकी रद्द केली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मोठा झटका दिला आहे. इम्रान खान यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे. तोशखाना प्रकरणी निवडणूक आयोगाने इम्रान खान यांची खासदारकी रद्द केली आहे. शिवाय, इम्रान खान यांच्यावर चुकीचे उत्तर दाखल केल्याचा आरोपही करण्यात आल्याचे समजते.

पाकिस्तानचे मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान रझा यांच्या अध्यक्षतेखालील 4 सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला. या निर्णयानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये, सत्ताधारी आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती की इम्रान खान यांनी तोशखान्यात साठवलेल्या भेटवस्तू स्वस्त:त विकत घेतल्या आणि त्या चढ्या किमतीत विकल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेत निर्णय राखून ठेवला होता.

इम्रान खान 2018 मध्ये पंतप्रधान झाले. अरब देशांच्या भेटींमध्ये त्यांना तेथील राज्यकर्त्यांकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. इम्रानने त्यांना तोशखान्यात जमा केले होते. पण नंतर इम्रान खानने ते तोशखान्यातून स्वस्तात विकत घेतले आणि नफ्यात विकले. या संपूर्ण प्रक्रियेला त्यांच्या सरकारने कायदेशीर परवानगी दिली होती.

माजी पंतप्रधानांनी सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाला सांगितले होते की त्यांनी या भेटवस्तू राज्याच्या तिजोरीतून 2.15 कोटी रुपयांना विकत घेतल्या आणि 5.8 कोटी रुपयांना विकल्या. भेटवस्तूंमध्ये एक ग्राफ घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता.

इम्रान खान यांनी आयकर रिटर्नमध्ये या भेटवस्तूंची विक्री दाखवली नसल्याचा आरोप आहे. इम्रान खान यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका विरोधी पक्षाच्या खासदारांनी दाखल केली होती.

निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर इम्रान खान यांना पाच वर्ष निवडणूक लढवू शकणार नाहीत. याशिवाय त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची शिफारसही करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेरही गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button