breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भिवपुरीजवळ सिंहगड एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडले

मुंबई : भिवपुरी रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याने ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या वेळेत कामावरून सुटून घरी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी असते. अशात मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. (local train service of Central Railway has been disrupted during rush hours due to engine shutdown of Sinhagad Express)

गेल्या पाऊण तासापासून वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे मार्गावर कल्याण-कर्जत दरम्यान ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. भिवपुरी रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसचे इंजिन अचानक बंद पडले. त्याचा परिणाम थेट मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला. सिंहगड एक्सप्रेसच्या मागे असलेल्या सर्व रेल्वे गाड्या खोळंबल्या आहेत.

कृष्ण जन्माष्टमीसाठी प्रवाशांना लवकर जायचे होते घरी

आज कृष्ण जन्माष्टमी असल्याने आणि उद्या गोविंदा असल्याने कामावरून घरी परतण्याची चाकरमान्यांची लगबग होती. मात्र, ऐन गर्दीच्या वेळेत मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने या सणाच्या तयारीसाठी लोकांना वेळेत घरी पोहोचता आले नाही. सिंहगड एक्स्प्रेसचे बंद पडलेले इंजिन दुरुस्त करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून, लवकर मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button