breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शेतक-यांचा पीक विमा उतरविण्यासाठी मावळात शिवसेनेची जोरदार तयारी

पिंपरी, (महाईन्यूज) – शिवसेनेच्या वतीने मावळ तालुक्यामध्ये चार ठिकाणी पीकविमा मदत केंद्र उभारण्यात आले. यावेळी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीकविमा योजनेसंदर्भातील अडीअडचणी व तक्रारी मांडण्यासाठी मावळ तालुका कृषी अधिकारी यांची वडगाव येथे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. शेतक-यांना भेडसावणा-या सर्व समस्य यावेळी मांडण्यात आल्या.

यावेळी पीकविमा योजनेतील मागील वर्ष २०१८-१९ मधील ३ हजार ५०० शेतकऱ्यांचा पीकविमा पीडीसीसी बँकेमार्फत उतरविला गेला. तालुका कृषी अधिकारी यांच्या नियंत्रण कक्षेत ३ मंडळ अधिकारी, ६ कृषी पर्यवेक्षक, व ३६ कृषी सहाय्यक असा ५१ जणांचा स्टाफ कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. परंतु, पीडीसीसी बँकेव्यतिरिक्त इतर ठिकाणी फक्त दोनच स्वयंस्फूर्तीने शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविल्याचे निदर्शनास आले. मागीलवर्षीच्या कामाबाबत आढावा घेऊन पीकविमा २०१९-२० या चालू वर्षात जास्तीजास्त शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविण्यासाठी २४ जुलै २०१९ ही अंतीम तारीख असल्याने भात, नाचणी, भुईमुग, क्षेत्रामधील शेतकऱ्यांनी जास्तीजास्त पिकविमा उतरविण्यासाठी व पीकविम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळण्यासाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे योग्य तो पत्रव्यवहार, पाठपुरावा करणेबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, तसेच मंडल अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, तालुका प्रमुख राजु खांडभोर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button