breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

दहा रुपयांच्या शिवभोजनासाठी आता लागणार आधार कार्ड आणि फोटो…ठाकरे सरकारचा नवा नियम…😦

मुंबई | महाईन्यूज |

दहा रुपयांची शिवभोजनाची थाळी घेण्यासाठी आधार कार्डची प्रत द्यावी लागणार आहे. शिवाय, थाळी घेणाऱ्या व्यक्तीला फोटोही काढावा लागणार आहे. 26 जानेवारीपासून ही योजना राज्यभरात सुरु होणार आहे. त्यासाठी सरकारनं आधारकार्ड आणि फोटोच्या नियमावलीवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

मुंबईत केईएम, नायर आणि कूपर हॉस्पिटलसह अन्य 15 ठिकाणी शिवभोजन थाळीची केंद्र सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर येथे चेहरा ओळख करणारं सॉफ्टवेअर अंमलात आणणार आहे. जेणेकरुन शिवभोजन थाळी योजना लागू असणाऱ्यांचा चेहरा ओळखण्यास मदत होणार आहे. सध्या मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांत दहा रुपयांत शिवभोजन थाळीची योजना सुरु आहे.

26 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या शिवभोजन योजनेसाठी आधार कार्ड घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. या योजनेत किती थाळ्या विकल्या गेल्या हे कळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर आधार कार्ड घेण्याचं सरकारनं ठरवलं आहे.मात्र याबाबत राम कदम यांनी विरोध दर्शवला आहे… “सर्वांना बिनशर्त भोजन मिळायला हव.सरकारने जनतेची थट्टा चालवली आहे का ?” असा प्रश्न विचारत त्यांनी सरकारच्या या नव्या नियमावलीला विरोध दर्शवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button