breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

महावितरणच्या स्मार्ट सुपर मीटरमुळे तब्बल १२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ

Mahavitaran : आता वीज कंपन्या देखील स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार आहेत. हे काम अदानींसह चार खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे. या मीटरमुळे मीटर रिडींग आणि देयक वाटपाची कामे बंद होणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात सुमारे १२ हजार कंत्राटी कामगारांसमोर बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे.

मे. अदानी, मे. एनसीसी, मे मॉन्टेकार्लो, मे. जिनस या चार कंपन्यांकडे महावितरणने स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचे कंत्राट दिले आहे. करारातील अटीनुसार स्मार्ट मीटर लावल्यापासून जवळपास १० वर्षे संबंधित कंपनीलाच मीटरचा डेटा घेणे, यंत्रणा विकसित करणे, मनुष्यबळ लावणे, मीटरमध्ये दोष उद्भवल्यास ते बदलून देण्याची जबाबदारी देखील या कंत्राट दिलेल्या चार कंपन्यांना पार पाडायची आहे.

हेही वाचा – Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेत भारताने मिळवली ५ सुवर्ण पदके

पहिले ही सर्व कामे कंत्राटदाराच्या मार्फत होत असल्याने या माध्यमातून सुमारे १२ हजार कामगारांना यातून रोजगार मिळत होता. मात्र आता स्मार्ट मीटर आल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. एकीकडे देशाचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री आम्ही बेरोजगारांच्या रोजगारावर भर देत आहेत असे ठणकावून सांगत असतात, तर दुसरीकडे आमच्यावर घरी बसण्याची वेळही सरकारच आणत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button