breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

देवेंद्रजी, आता आपणच शासनाला मार्गदर्शन करा- प्रकाश मेहता

मुंबई – राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोना रूग्णांची संख्या पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून देवेंद्रजी आपणच शासनाला मार्गदर्शन करा, अशी विनंती केली आहे.

कित्येकांची कुटुंबची कुटुंब रुग्णालयात आहेत. हे सगळं वेळीच थांबवण्यासाठी तुम्ही कृपया सकारात्मक मार्ग निघेल यासाठी शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावं, असं प्रकाश मेहता यांनी म्हटलं आहे.

देवेंद्रजी सप्रेम नमस्कार… कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढला आहे. घाटकोपर मध्ये आज सर्वाधिक 327 रूग्ण पॉजिटिव निघाले आहेत. स्थानिक रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी जागा रिकाम्या नाहीत. परत पूर्ण लॉकडाऊन करायची वेळ येणार आहे की काय असे वाटू लागले आहे. आता तर कित्येकांचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित असून एकाच रुग्णालयात उपचार घेताना आढळून येत आहेत. पती, पत्नी, मुलगा, सूनबाई एकाच रुग्णालयात पण वेगवेगळ्या वॉर्ड मध्ये दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे हे सगळे वेळीच थांबवण्यासाठी तुम्ही कृपया सकारात्मक मार्ग निघेल यासाठी शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती करतो, असं मेहता यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

दरम्यान, राज्यात गुरुवारी दिवसभरात 35 हजार 952 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. गुरुवारी दिवसभरात 20 हजार 444 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर दिवसभरात 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण 2 लाख 62 हजार 685 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

https://www.facebook.com/bjpprakashmehta/posts/3705000152937446

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button