breaking-newsTOP Newsगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीदेश-विदेश

गणपती बाप्पा मोरया! २ कोटी किंमतीच्या नोटांनी सजवलं गणपती मंदीर

Ganesh Utsav 2023 : गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र मोठा उत्साह सुरू आहे. गणपती बाप्पासाठी सर्वत्र आकर्शक सजावट केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, बंगळुरूच्या पुत्तेनाहली येथील सत्य साई गणपती मंदिरात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नोटांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे, जी खूपच जास्त सुंदर दिसते.

मंदिराच्या सजावटीसाठी २ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नोटा आणि ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची नाणी वापरण्यात आली आहेत. यामध्ये १०,२०,५०,१००,२००,५०० रुपयांच्या नोटा वापरण्यात आल्या आहेत. मंदिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यासह जवळपास २२ सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात आले आहेत.

हेही वाचा – महावितरणच्या स्मार्ट सुपर मीटरमुळे तब्बल १२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ 

सुमारे 150 स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांनी मिळून मंदिराची सजावट केली. ते तयार करण्यासाठी तीन महिने लागले. ही हटके सजावट पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button