breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत बिशप शाळेच्या आरुष डोळसला उपविजेतेपद

राज्यस्तरीय ११ वर्षांखालील गटात यश

पिंपरी(प्रतिनिधी)

पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल व एसपी यांनी प्रायोजित केलेली महाराष्ट्र राज्य ११ वर्षाखालील खुल्या फिडे रेटिंग स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. कर्वे रोड येथील श्री गणेश सभागृह येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत खुल्या गटात मुंबई उपनगरच्या विराज राणेने कोल्हापूरच्या अभय भोसले ला १२ चालींमध्ये बरोबरीत रोखले.

विराज याने ८ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. सांगवीच्या (पुणे) आरुष डोळसने नागपूरच्या सेहजवीर सिंग मरासचा सहज पराभव करून ७.५ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. पुण्याच्या शाश्वत गुप्ताने तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेतील खुल्या गटातील विजेत्या विराज राणेला करंडक व ३५०० रुपये तर, उपविजेत्या आरुष डोळसला करंडक व २००० रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.

हेही वाचा – ‘मैं हूँ बार्बी गर्ल’ म्हणत बार्बीची जगभरात ८२७० कोटी रूपयांची कमाई 

आरुष आणि विराज हे दोघे ऑक्टोबर मध्ये विशाखापट्टणम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रचे प्रतिनधीत्व करणार आहेत. आरुष डोळस याने यापूर्वी जागतिक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकवले होते.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे उपाध्यक्ष व ट्रुस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल, स्नार्क पावर लिमिटेडच्या इंजिनिअरिंग व सप्लाय चेन विभागाचे व्यवस्थापक रोहीत मदन, पीडीसीसीचे सचिव डॉ.संजय करवडे, पीडीसीसीचे सदस्य हर्निश राजा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, डॉ. दिपक रिपोटे, चीफ आरबीटर दिप्ती शिदोरे, राजेंद्र शिदोरे, स्पर्धा संचालक विनिता श्रोत्री आदी मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button