breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीपुणे

द्रोणा स्पोर्ट क्लब संघ, भैरवनाथ क्रीडा संस्था संघाना विजेतेपद

कै. शंकरराव ढमाले स्मृती चषक ; जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

पुणे : अतितटीच्या लढतीमध्ये महिला गटातून द्रोणा स्पोर्ट क्लब संघाने एमएच स्पोर्ट क्लब संघाला तर पुरुष गटातून भैरवनाथ क्रीडा संस्था भोसरी संघाने चेतक, बालेवाडी संघाला पराभूत करताना शिवसेना कसबा मतदार संघ आणि पूना अमॅच्युअर्स संघाच्या वतीने कै. शंकरराव ढमाले स्मृती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

नातूबाग मैदानावर झालेल्या महिला गटाच्या अंतिम लढतीमध्ये द्रोणा क्लब संघाने एमएच स्पोर्ट्स क्लब संघाला २७-२४ असे पराभूत केले. मध्यंतराला एमएच स्पोर्ट्स संघाने १३-९अशी ४ गुणांची आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर भूमिका यादव, सई पिसे, काव्या गायकवाड यांनी जोरदार खेळ करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. एमएच स्पोर्ट क्लब संघाकडून प्रतीक्षा करेकर, स्वप्नाली पासलकर, राखी जोशी यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. महिला गटात शिवछत्रपती कबड्डी संघ तिसरे तर प्रकाश तात्या बालवडकर संघाने चौथे स्थान राखले.

हेही वाचा – अर्थसंकल्पावर मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले,’बेजेटमधून मराठा आरक्षण..’

पुरुष गटाच्या भैरवनाथ क्रीडा संस्था भोसरी संघाने चेतक संघ बालेवाडीला ३२-२९ असे पराभूत केले. मध्यंतराला चेतक संघाने १८-१४ अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सत्रात भैरवनाथ संघाच्या खेळाडूंनी आपला खेळ उंचावला. विजय लांडगे, आदित्य चौगुले, योगेश कड, संकेत लांडगे यांनी संघाला विजय मिळवून दिला. मात्र, पराभूत संघाकडून आशिष पाडाळे, रुद्र पिंपळे, गणेश तापकीर यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

विजेत्या संघाना शहर प्रमुख गजानन थरकुडे, चंदन साळुंखे, माजी नगरसेवक विशाल धनवडे, विलास सणस यांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी आयोजक संजय नाईक आणि उमेश गालिंदे यांनी सामने यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button