ताज्या घडामोडीराष्ट्रिय

सर्व बँका सेकंड हँड कार खरेदीसाठी कर्ज देतात.

कोरोना काळात आपल्या सुरक्षेसाठी अनेकांनी खासगी वाहतुकीचा पर्याय निवडला. परिणामी कार विक्रीत वाढ झाली आहे. आता तुम्हीदेखील सेंकड हँड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

नवीन कार खरेदीसाठी जसे कर्ज मिळते, तसे जुनी कार खरेदी करण्यासाठीदेखील मिळते. पगारदार आणि व्यवसायिक प्री-ओन्ड कार लोनसाठी अर्ज करू शकतात. यासाठी पात्रता निकष भिन्न असू शकतात. तुम्ही पात्रता निकष पूर्ण केले तर जवळपास सर्व बँका सेकंड हँड कार खरेदीसाठी कर्ज देतात.

तुमचं लोन ऍप्लिकेशन स्वीकारण्यापूर्वी बँका तुमचं उत्पन्न, कारची व्हॅल्यू आणि तुमचा क्रेडिट स्कोअर विचारात घेतात. बहुतेक बँका कारच्या एकूण किंमतीच्या ९५ टक्क्यापर्यंत कर्ज देतात. मात्र जर तुमचा क्रेडिट स्कोअर, उत्पन्न आणि कारची स्थिती बँकेच्या पात्रता निकषांशी जुळत असेल तर काही बँका तुमच्या वाहनाच्या किंमतीइतकीही रक्कम देऊ शकतात. तसेच काही बँका तीन वर्षांपेक्षा जुन्या कारसाठी कर्ज देण्यास नकार देऊ शकतात. त्यामुळे लोन ऍप्लिकेशन देण्यापूर्वी बँकेकडून याबाबत सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे. हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता किंवा जवळच्या बँकेत प्रत्यक्ष जाऊनही कर्ज मागू शकता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button