breaking-newsताज्या घडामोडी

ट्रेनमधील रिकाम्या सीटची माहिती मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

IRCTC App | IRCTC App व वेबसाइटच्या माध्यमातून अ‍ॅडव्हान्स तिकीट बुक करण्याची सुविधा मिळते. परंतु अनेकदा तुम्हाला अचानक कुठेतरी जावं लागतं आणि तेव्हा ट्रेन मध्ये रिजर्व्हेशन मिळत नाही. आणि रिजर्व्हेशनविना ट्रेनमध्ये प्रवास करणं खूप कठीण आहे. अश्यावेळी लोक रेल्वे स्टेशन जाऊन TTE शी बोलतात आणि ट्रेनमधील रिकाम्या सीटची माहिती घेतात आणि त्यानंतर तिकीट खरेदी करतात.

परंतु आता असे करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या IRCTC अ‍ॅपच्या माध्यमातून ट्रेनमधील रिकामी सीटची माहिती मिळवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला आयआरसीटीसी अ‍ॅप वर लॉग-इन करण्याची पण गरज नाही. चला जाणून घेऊया प्रोसेस.

ट्रेनमधील रिकाम्या सीटची माहिती मिळवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वप्रथम IRCTC अ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनमध्ये ओपन करा.
  • त्यानंतर अ‍ॅपमधील ‘Train’ आयकॉनवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला ‘Chart Vacancy’ चा ऑप्शन दिसेल.

हेही  वाचा    –    अर्थसंकल्पावर मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले,’बेजेटमधून मराठा आरक्षण..’

  • Chart Vacancy वर टॅप करा.
  • त्यानंतर तुमचं नाव आणि त्या ट्रेनचा नंबर टाका ज्यात तुम्हाला प्रवास करायचा आहे.
  • आता तुम्ही जिथून ट्रेन पकडणार आहेत त्या स्टेशनचे नाव टाका.
  • त्यानंतर तुम्हाला त्या ट्रेनमध्ये असलेल्या रिकाम्या सीट्सची माहिती मिळेल.
  • विशेष म्हणजे आयआरसीटीसीच्या या ‘Chart Vacancy’ फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला IRCTC अ‍ॅपवर लॉग-इन करण्याची गरज नाही.

IRCTC वेबसाइटच्या माध्यमातून कशी बघायची सीट?

  • सर्वप्रथम IRCTC वेबसाइट ओपन करा.
  • होम पेजवर तुम्हाला Book Ticket बॉक्सच्या बाजूला “Charts/Vacancy” दिसेल.
  • त्या ऑप्शनवर क्लिक करा, आता तुमच्या समोर “Reservation Chart” ओपन होईल.
  • त्यात आवश्यक माहिती भरा आणि Get Train Chart वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही ट्रेन मध्ये रिकाम्या सीट्सची माहिती मिळेल.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button