breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी-मोशी येथील ‘डीपी’ रस्ता विकासित करावा : निखिल बोऱ्हाडे

वाहतूक कोंडीवर मार्ग काढावा : महापालिका आयुक्तांना निवेदन

पिंपरी : वाढते शहरीकरण, वाहतूकीकरण आणि नागरिकांच्या समस्या लक्षात घेता, मोशी-बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी येथील 30 मीटर डीपी रस्ता विकसित करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निखिल बोऱ्हाडे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, देहू-आळंदी या मार्गावरील वाहतूक अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या बाबीचा प्रकर्षाने विचार करता, मोशी, बोऱ्हाडेवाडी, चिखली, जाधववाडी, तळवडे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रहिवाशी वाढल्यामुळे ये-जा करण्यास नागरिकांना त्रास होत आहे. हा रस्ता 30 मीटर असून, याचा मार्ग निघण्याचे ठिकाण हवलदार वस्तीपासून बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, चिखली, कुदळवाडी, सोनावणे वस्तीपासून तळवडे रस्त्याला जोडला जोतो. त्यामुळे हा रस्ता विकसित झाला तर या भागांमधील वाहतूक कोंडी होणार नाही. त्यामुळे प्रशासनाने सकारात्मक पुढाकार घेणे अपेक्षीत आहे.

मोशी-बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी येथील रस्ता हा 80 टक्के मनपाच्या ताब्यात आहे व हा रस्ता विकसित करण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. यासाठी या रस्त्याचे काम पूर्ण करून द्यावे. अशी आमची ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे.
-निखिल बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button