TOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षांचा राजीनामा; पिंपरी-चिंचवडमध्ये अजित गव्हाणे यांचे ‘वेट अँड वॉच’

स्थानिक पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाच्या हालचालींकडे लक्ष : पक्षाध्यक्ष निर्णयाबाबत कमालीची उत्सुकता

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा. या मागणीसाठी राज्यभरातील नेते, पदाधिकारी मनधरणी करीत आहेत.

दरम्यान, शरद पवार यांनी आपला निर्णय रद्द करावा. या मागणीसाठी पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील अनेक जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सत्र सुरू केले आहे. याबाबत पिंपरी-चिंचवडचे शहराध्‍यक्ष अजित गव्हाणे आणि पदाधिकारी तुर्तास ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत आहेत. शहर राष्ट्रवादीत शांतता असून, प्रदेश पातळीवर काय निर्णय होते, याकडे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. चव्हाण सेंटर येथे ‘लोक माझा संगती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. पवार यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते प्रयत्नशील आहेत. पुण्यातील पदाधिकाऱ्यांनीही शरद पवारांच्या निर्णयाला विरोध केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button