breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीत महिलांना सन्मानपूर्वक कार्य करण्याची संधी- चित्रा वाघ

पिंपरी चिंचवड महिला आघाडीच्या वतीने खासदार वंदना चव्हाण यांचा सत्‍कार

पिंपरी-  राजकीय क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्‍तेदारी आहे. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दुरदृष्टीमुळेच महाराष्ट्रात महिलांविषयक धोरणांची अंमलबजावणी झाली. राष्ट्रवादीमध्ये देखील महिलांना योग्य आणि सन्मानपूर्वक कार्य करण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.

राज्‍यसभेच्या खासदार पदावर वंदना चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. त्‍यानिमित्‍त पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने वंदना चव्हाण यांच्या हस्ते चिंचवडमध्ये सत्‍कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी महापौर अनिता फरांदे व ज्‍येष्ठ नगरसेविका मंगला कदम, अपर्णा डोके, नगरसेविका सुलक्षणा धर, युवती आघाडीच्‍या वर्षा जगताप आदी उपस्थित होते.

चित्रा वाघ म्‍हणाल्या की, आगामी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत महिला आघाडीने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नवनियुक्‍त प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार प्रत्‍येक प्रभाग, बुथ स्‍तरावर संघटन उभे करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

तसेच खासदार वदंना चव्हाण म्‍हणाल्‍या की, महिला आर्थिकदृष्टया स्वावलंबी झाली की घरातुनसुध्दा हळुहळु मदत मिळू लागते. त्‍यासाठी महिलांमध्ये आत्‍मविश्वास निमार्ण करणे आवश्यक आहे. देशात सर्वप्रथम महिलाविषयक धोरण महाराष्ट्र राज्‍यामध्ये अंमलात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दुरदृष्टीमुळेच राज्‍यात सरकारी खात्‍यामध्ये तसेच राजकारणातही महिलांसाठी 30 टक्‍के जागा राखीव ठेवण्यात आल्या. त्‍याचा सकारात्‍मक परिणाम आता पहायला मिळत असून अनेक महिला शासकीय सेवेत किंवा राजकीय क्षेत्रात उच्चपदावर पहायला मिळतात. कुटुंबियांचा तसेच पवार साहेबांची दुरदृष्टी आणि पाठिंब्‍यामुळे मला राजकारणात येण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादीमध्ये माणसाची अभ्यासूवृत्ती, जनमानसात असलेली प्रतिमा, क्षमता पाहून जबाबदा-या दिल्‍या जातात. सार्वजनिक क्षेत्रात काम करताना महिलांनी महिलांविषयी आदर राखण्याची गरज आहे, असे  खासदार चव्हाण म्‍हणाल्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली काळभोर यांनी केले. सुत्रसंचालन शिल्‍पा बिडकर, तर मनिषा गटकळ यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button