TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

शिवतीर्थ मैदान वाचवण्यासाठी भक्ती शक्ती उद्यानाबाहेर राबवली स्वाक्षरी मोहीम

पिंपरी: भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने PMRDA शिवतीर्थ मैदान प्लॉटिंग काढून विक्री करण्याचा घाट घातला आहे.या मैदानाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक भेटीचे वारसा सांगणाऱ्या तसेच जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या ऐतिहासिक स्वागताची साक्ष देणाऱ्या ,तसेच शहरातील सर्वात मोठी शिवजयंती याच मैदानावर साजरी केली जाते ,यात हजारो शिवप्रेमी सहभागी होत असतात .भक्ती शक्ती शिल्पा शेजारील ऐतिहासिक व धार्मिक वारसा असणाऱ्या शिवतीर्थ मैदानाचे व्यापारीकरण करून बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न पीएमआरडीए प्रशासनाकडून सुरु आहे.

पीएमारडीए प्रशासनाच्या निषेधार्थ व शिवतीर्थ मैदानाच्या समर्थनार्थ भक्ती शक्ती उद्यान येथे दोन दिवस स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती तिला शहरातील अनेक पक्षांचे नगरसेवक, सामाजिक संघटनेचे नेते,सामाजिक कार्यकर्ते व शहरातील शिवप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. या मोहिमेचे नियोजन भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे अभिषेक म्हसे,सागर तापकीर,जीवन बोराडे,सचिन ढोबळे,अक्षय कारंडे,अतुल वरपे,भावेश काचा,हेमंत शिर्के,प्रसाद फिरोदिया, प्रतीक इंगळे, जालिंदर काटकर,गौरव सुर्यवंशी आदींनी केले होते. समितीच्या वतीने पीएमारडीए कार्यालया समोर लवकरच मोठे जन आंदोलन करण्यात येणार आहे असे समितीचे जीवन बोराडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button