TOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

लावण्याऐवजी करा ‘हे’ घरगुती उपाय; मिळवा घनदाट पापण्या

असं म्हणतात की, डोळ्यांचं सौंदर्य कोणाच्याही रुपात भर टाकून जातं. महिला वर्गात तर, हे डोळे आणखी रेखीव करण्यासाठी असंख्य उपाय आणि बऱ्याच Tricks वापरल्या जातात. पण, प्रत्येक वेळी हे सर्व करण्यासाठीचा वेळ आपल्याकडे असेलच असं नाही. किंबहुना या Tricks वापरून त्या आपल्या चेहऱ्याला शोभतात की नाही, हासुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न. खोट्या पापण्या, अर्थात Fake eyelashes वापरताना हाच अनुभव अनेकजणींना येतो. काहीजणी तर पापण्या विरळ असल्यामुळं सर्जरी करण्याचाही पर्याय निवडतात. पण, मुळात काही सोपे उपाय केल्यास ही वेळ तुमच्यावर येणार नाही.

डोळ्यांच्या पापण्या सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि त्या अधिक घनदाट करण्यासाठी काही खालील उपाय नक्की करुन पाहा. 

सिरमचा वापर

हल्ली  बाजारात बरेच असे सिरम उपलब्ध आहेत ज्यामुळं पापण्या मजबूत आणि मॉइस्चराइज होतात. यामुळं पापण्यांचे केस तुटत नाहीत. सोबतच त्या अधिक घनदाट होतात. रात्री झोपण्याआधी सिरमचा वापर करणं नेहमी फायद्याचं. 

पापण्यांना ब्रश करा

मस्कारा ब्रशचा वापर करत नेहमी पापण्यांना ब्रश करा. हे स्ट्रोक अगदी सावकाशपणे मारा. असं केल्यामुळं पापण्यांचे एकमेकांना चिकटलेले केस मोकळे होतील. यामुळं पापणीवर असणारी धुळही निघून जाते. 

आहाराच्या सवयींमध्ये बदल करा

डोळ्यांचं, पापण्यांचं सौंदर्य आहाराच्या सवयींवरही अवलंबून आहे. यासाठी ओमेगा 3 आणि फॅटी अॅसिडअसणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. बदाम, मासे, पालेभाज्या, अॅवाकॅडो या पदार्थांच्या सेवनानं पापण्याही मजबूत आणि सुंदर होतात. 

पापण्यांवर तेल किंवा अॅलोवेरा जेल लावा

पापण्या रुक्ष झाल्या असतील तर त्यावर अॅलोवेरा जेल किंवा खोबरेल तेल लावा. Alovera Gel मुळे कोलेजन वाढतं आणि यामुळं पापण्यांना आवश्यक असणारी पोषक तत्त्वं मिळतात. झोपण्यापर्वी तुम्ही पापण्यांवर तेल किंवा अॅलोवेरा जेल लावा. यामुळं पापण्यांमध्ये असणारी आर्द्रता कायम राहते आणि दिवसागणिक त्यांचं सौंदर्य आणखी खुलून  जातं. 

सतत केमिकलयुक्त प्रसाधनांचा वापर करणं टाळा आणि डोळ्यांना ताण येईल अशी कामं प्रकर्षानं टाळा. डोळे चोळू नका, असं केल्यासही पापण्यांचे केस तुटतात. त्यामुळं डोळे हा अवयव अतिशय नाजू असून, तो तितक्याच नाजूकपणे हाताळणं महत्त्वाचं आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button