breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पीएफधारकांना दिवाळीत दिलासा; व्याजाचा हप्ता बँकेत जमा होणार

नवी दिल्ली – सप्टेंबरमध्ये जाहीर केल्याप्रमाणे कर्मचारी भविष्य निधी कार्यालय दिवाळीपर्यंत आपल्या पीएफधारक कामगार खातेदारांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंतच्या जमा पीएफ रकमेवरील ८.५० टक्के दराच्या व्याजाचा पहिला हप्ता जमा करणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे. ईपीएफओच्या सुमारे ६ कोटींपेक्षा जास्त कामगारांना याचा फायदा मिळणार आहे.

ईपीएफओच्या केंद्रीय मंडळाची सप्टेंबरमध्ये बैठक झाली होती. त्यात कामगारांच्या खात्यातील जमा रकमेवरील यंदाच्या ८.५० टक्के व्याजाचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या हप्त्यात ८.१५ टक्के रक्कम देण्यात येणार आहे. दुसऱ्या हप्त्यात ०.३५ टक्के आणि तिसऱ्या हप्त्यात ०.३५ टक्के दिले जाणार आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या कामगारांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात २५ मार्चपासून आतापर्यंत पीएफ खात्यातून ३८ लाख ७१ हजार ६६४ कर्मचाऱ्यांनी ४४ हजार ५४.७२ कोटी रुपये काढले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button