ताज्या घडामोडीपुणेराजकारण

भाजप कार्यकर्त्यांकडून पैशांच वाटप सुरू

रवींद्र धंगेकराच ठिय्या आंदोलन सुरू

पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे.सर्व ठिकाणी प्रचाराची धामधूम सुरू आहे. तर उद्या चौथ्या टप्प्याच मतदान होत आहे. या चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश असून या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ,महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर,वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे, एमआयएमकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके या चार ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात आला.

तर या मतदानाला काही तास शिल्लक राहिले आहेत.मात्र त्यापूर्वी सहकारनगर भागात भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पैशांचे वाटप करीत आहेत. त्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलीस आणि निवडणुक आयोगाचे अधिकारी कारवाई करीत नाही. या भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलनास बसले आहेत. रवींद्र धंगेकर यांच्या या आरोपावर भाजप नेत्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button