पिंपरी / चिंचवड

सामायिक रस्त्यातून पाईपलाईन खोदताना भावकीत वाद

पिंपरी l प्रतिनिधी

सामायिक रस्त्यातून पाईपलाईन खोदताना भावकीतील दोन गटात वाद झाला. एका गटाने पाईपलाईन खोदण्याचे काम करणा-या जेसीबीवर दगडफेक करून नुकसान केले. ही घटना बुधवारी (दि. 9) सकाळी साडेनऊ वाजता मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे घडली.

मनश्री अमोल चांदेरे (वय 29, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुकाराम श्रीपती चांदेरे (वय 55), संगीता तुकाराम चांदेरे (वय 50), प्रमोद तुकाराम चांदेरे (वय 30), प्रसाद तुकाराम चांदेरे (वय 28, सर्व रा. सुसगाव, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती त्यांच्या सुसगाव येथील विहिरीतून घरापर्यंत पाण्याची पाईपलाईन करीत होते. घराजवळील सामायिक रस्त्यावरून पाईपलाईन खोदत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी पाईपलाईन खोदण्यासाठी विरोध करत फिर्यादी आणि त्यांच्या पतीच्या दिशेने दगड फेकला. तो दगड फिर्यादी यांनी हुकवला असता आरोपींनी लागतात दगडफेक करून जेसीबीचे नुकसान केले. आरोपी संगीता आणि प्रसाद यांनी फिर्यादी यांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी प्रमोद चांदेरे याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button