breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात पोस्टकोविड उपचार केंद्र सुरु

पिंपरी |महाईन्यूज|

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कोविडनंतरचे पुनर्वसन केंद्र (पोस्टकोविड रिहॅबिलिटेशन सेंटर) सुरु करण्यात आले आहे. मंगळवारपासून केंद्र रुग्णांसाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. केंद्रामध्ये यासाठी अद्ययावत उपकरणे उपलब्ध केली आहेत.

कोविड रुग्ण, कोविड बरा झाल्यानंतरही अशक्तपणा, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दम लागणे यामुळे त्रस्त आहेत. त्यांचे पुनर्वसन करुन त्यांची शारीरिक क्षमता तसेच दैनंदिन जीवनशैली सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पदव्युत्तर संस्था- वायसीएमएचमध्ये कोविडनंतरचे पुनर्वसन केंद्र (पोस्टकोविड रिहॅबिलिटेशन सेंटर) सुरु करण्यात आले आहे. मंगळवारपासून केंद्र रुग्णांसाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. केंद्रामध्ये यासाठी अद्ययावत उपकरणे उपलब्ध केली आहेत.

कोविड बरे झालेले पण कार्यक्षमता कमी झालेल्या रुग्णांना येथे भौतिकोपचार तज्ज्ञ (फिजिओथेरपिस्ट) उपकरणांच्या सहाय्याने योग्य व्यायाम शिकवतील. वेळोवेळी रुग्ण सुधारणेबाबत दखल घेतील. या पुनर्वसन केंद्रामध्ये आवश्यक उपकरणे उपलब्ध करण्यासाठी महापालिका व सिप्ला फाऊंडेशनने पुढाकार घेतला. तसेच महापालिकेने तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टची नेमणूक केली. केंद्र सुरु करण्याकामी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी अधिष्ठाता डाॅ. राजेश वाबळे, सिप्ला फाऊंडेशनचे प्रमुख अनुराग मिश्रा, डाॅ. क्रांती रायमाने, उरोरोग विभागप्रमुख , भौतिकोपचार विभागप्रमुख यांनी वेळोवेळी बैठका घेऊन आढावा घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button